#Corona
ना.धनंजय मुंडे यांना पुन्हा कोरोनाची लागण…….!
बीड दि.२४- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दुसर्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती आहे आहे.
त्यांनी म्हटल्याप्रमाणे, माझी आज दुसर्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी, असेही आवाहन केले आहे