#Corona

कोरोना संसर्गाचे सर्वात जास्त प्रमाण तरुणांमध्ये……..! 

मुंबई दि.२४ – राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आतापर्यंत संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक तरुण वर्गालाच करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात ३० ते ४० वर्ष वयोगटातील रुग्ण सर्वाधिक, म्हणजे २१ टक्के एवढे आहेत. त्यामुळे दुसरी लाट सुरू झाल्यानंतर आता तरुण वर्गाने सर्वाधिक खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या रुग्णसंख्येच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. राज्यात आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वात कमी म्हणजे १.६९ टक्के रुग्ण ८० वर्षांवरील वयोगटातील आहेत. १० वर्षांखालील मुलांना संसर्गाचे प्रमाण ३.४४ टक्के एवढे आहे. ११ ते २० वर्ष वयोगटात हे प्रमाण काहीसे वाढले असून ६.६७ टक्के रुग्ण या वयोगटातील आहेत. ७१ ते ८० वर्ष वयोगटातील ५.२९ टक्के रुग्णांना करोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

सर्वाधिक रुग्णसंख्या २१ ते ७० वर्ष या दरम्यान आढळली आहे. २१ ते ३० वर्षांदरम्यान १६.३३ टक्के रुग्णांना करोना संसर्ग झाला. सर्वाधिक रुग्णसंख्येचा वयोगट ३१ ते ४० वर्ष आहे. ४१ ते ५० वर्ष वयोगटात १८ टक्के रुग्ण आहेत. ५१ ते ६० वर्ष वयाचे १६.२३ टक्के रुग्णांना करोना संसर्ग झाला. ६१ ते ७० वर्ष वयाचे ११ टक्के रुग्ण करोना बाधित झाले.

दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी भारतीयांना  इशारा दिला असून ते म्हणाले, “अजून एक ते दीड वर्षे मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close