#Corona

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या…….! 

केज दि.३० – पहिलीच मुलगी झाली आणि दुचाकी घेण्यासाठी माहेरहुन ३० हजार रुपये घेऊन येण्याच्या जाचास कंटाळून एका २१ वर्षीय विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील बनसारोळा येथे घडली. याप्रकरणी पती, सासू, सासरा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
       बनसारोळा येथील मयत सुनीता दिनकर गोरमाळी ( वय २१ ) या महिलेचा दिनकर गोरमाळी याच्यासोबत १० फेब्रुवारी २०१९ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना पहिली मुलगी झाली. त्यांनतर तुला पहिलीच मुलगी झाली व माहेरहून दुचाकी घेण्यासाठी ३० हजार रुपये घेऊन ये असे म्हणत सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळास कंटाळून सुनीता हिने २९ मार्च रोजी सकाळी दहा वाजता गावातील कुंडलिक शंकर गोरे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सुनीताचे वडील पांडुरंग कचरू दुधाळ ( रा. हिवरसिंगा ता. शिरूर कासार ) यांच्या फिर्यादीवरून पती दिनकर गोरमाळी, सासू मंदोदरी गोरमाळी, सासरा सावत गोरमाळी यांच्याविरुध्द युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close