कळंब दि.3 – कळंब तालुक्यातील अंदोरा गावाजवळ येरमाळ्या कडून भरघाव वेगात येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने पती पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जिल्हा परीषद प्रशाला जवळा येथील शिक्षक सुधीर लोमटे (वय 47) हे पत्नीसह कन्हेरवाडी येथील नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी मोटारसायकलवरून जात होते. त्या दरम्यान पुण्याहुन येणाऱ्या भरधाव कारने अंदोरा (ता. कळंब) येथील पुलाजवळ सुधीर लोमटे व अनिता सुधीर लोमटे या दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सुधीर लोमटे यांचा जागीच मृत्यु झाला, तर त्यांची पत्नी अनिता लोमटे (४०) यांचा दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
सदरील अपघात आज शनिवारी 11 च्या दरम्यान झाला. कार चालकाने मात्र अपघात होताच घटनास्थळावरून पळ काढला.