#Corona

रेमडेसिविर इंजेक्शन सरसकट देऊ नका, कोविड टास्क चे प्रमुख डॉ. संजय ओक यांचे निर्देश…….!

नवी दिल्ली दि.१४ – रेमडेसिविरचा साठा कमी पडत असल्याने राज्यात चिंतेचं वातावरण आहे. अशातच आता रेमडेसिविरचा वापर कसा करावा यासाठी कोविड टास्कचे प्रमुख डाॅ. संजय ओक यांनी माहिती देऊन अगदी कळकळची विनंती केली आहे.

रेमडेसिविर हे जीव वाचवण्याचं औषध नसून ते सगळ्यांना देण्यात येऊ नये, अशी मागणी संजय ओक यांनी केली आहे. रेमडेसिविर हे अँटिव्हायरल प्रकारात मोडणारं औषध आहे. जेव्हा एखाद्या व्हायरसची शरीरात वाढ मोठ्या प्रमाणात होते, ती रोखण्याचं काम रेमडेसिविर करतं. मी डॉक्टरांना कळकळीची विनंती करून सांगतो की रेमडेसिविर हे लाईफ सेव्हिंग औषध नाही त्यामुळे रेमडेसिविर दिल्यानं प्राण वाचत नसल्याचं संबंधित डाॅक्टराने सांगितलं आहे.

शरीरातील ऑक्सिजनची पातळी, व्हिटामिन सी, झिंक, पाण्याचं प्रमाण उत्तम ठेवणं हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. रेमडेसिविर योग्य त्या रुग्णालाच दिलं जावं त्यामुळे ते सरसकट देण्याचं औषध नाही, असं डाॅ. ओक म्हणाले आहेत. काही कोरोना रुग्णांचे नातेवाईक घरीच उपचार व्हावेत यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. पण रेमडेसिविर हे कुठेही आणि कधीही देण्याचं औषध नसून रेमडेसिविर घरी दिलं जाऊ नये, ते त्या प्रकारचं औषध नाही, ते रुग्णालयातलं औषध आहे, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, डाॅ. ओक यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला 2 ते 9 दिवसांच्या कालावधीत रेमडेसिविर द्यायचं असतं. काही ठिकाणी रुग्णांना 9 ते 14 दिवस रेमडेसिविर दिलं जातं आहे. त्याचा उपयोग होत नाही. रेमडेसिविर केवळ 5 डोसेसमध्ये द्यायचं औषध आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close