क्राइम

बायकोला नांदायला का पाठवत नाही म्हणून जावयाने उचलले टोकाचे पाऊल…..!

केज दि.२६- तालुक्यातील साळेगाव येथे एका महिलेचा राज्य रस्त्यावर मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी दि.२५ रोजी समोर आली होती. प्रथम दर्शनी खून कोणी केला ? हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र अवघ्या कांही तासातच सदरील घटनेचा उलगडा झाला असून जावयानेच बायकोला नांदायला का पाठवत नाही म्हणून एका साथीदारासह सासूचा खून केल्याचे कारण समोर आले आहे. धारदार शस्त्राचे वार करून सासूचा खून केल्याचे समोर आले आहे.
      अंबाजोगाई तालुक्यातील घायगुडा पिंपळा येथील लोचना माणिक धायगुडे व त्यांचा पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे साळेगाव येथे रविवारी सकाळी सुलोचना यांचा जावई अमोल वैजनाथ इंगळे यांना कांही कारणास्तव भेटण्यासाठी दुचाकीवर आले होते. मात्र ते भेटून परत अंबाजोगाई ला जात असताना राज्य रस्त्यावरील एका हॉटेल समोर जावई व सासू यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यातच अमोल इंगळे याने चुलती पुतण्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लोचना यांच्या चेहऱ्यावर, मानेवर व हातावर धारदार शस्त्राचे वार करून जखमी केले. त्यातच सुलोचना यांचा मृत्यू झाला व पुतण्या ही जखमी झाला होता.
       सदरील घटनेची माहिती मिळताच केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, एपीआय संतोष मिसळे, कर्मचारी अशोक नामदास, श्री. कादरी, अमोल गायकवाड, मंगेश भोले, दिलीप गित्ते यांनी धाव घेऊन श्री.कादरी यांनी धाव घेऊन तात्काळ सूत्रे हलवत गुन्ह्याचा माग काढला. यामध्ये आरोपीची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली होती व बरेच दिवस झाले तरी तिला नांदायला पाठवत नसल्याच्या कारणावर आरोपी अमोल वैजनाथ इंगळे याने त्याचा साथीदार प्रशांत बबन इंगळे या दोघांनी मिळून सासू व चुलत मेव्हण्यावर हल्ला केला होता. यामध्ये अंकुश धायगुडे हा जखमी झाला तर सासू लोचना धायगुडे ह्या जागीच मृत झाल्या होत्या.
          दरम्यान पोलिसांनी जावई अमोल इंगळे याचा साथीदार प्रशांत इंगळे यास अटक केली असून न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून जावई फरार आहे. पुढील तपास एपीआय संतोष मिसळे हे करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close