क्राइम

पाठलाग करून महिलेचा विनयभंग, केज पोलिसांत गुन्हा दाखल…….!

केज दि.२९ – एका २७ वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिला एकटीला गाठून विनयभंग केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एक जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
       केज तालुक्यातील एका गावातील २७ वर्षीय महिला ही २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शेतात जात असताना आरोपी प्रशांत राजाभाऊ सोनवणे ( रा. मस्साजोग ता. केज ) याने तिचा पाठलाग केला. गावालगतच्या नदीजवळ तिला गाठून जवळपास कोणी नसल्याची संधी साधून वाईट हेतूने तिचा उजवा हात धरला व लज्जास्पद बोलून छेडछाड करू लागला. महिलेने विरोध करीत माझ्या घरी सांगते असे म्हणताच आरोपी प्रशांत सोनवणे याने पीडित महिलेच्या गालात चापट मारून तू कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत सोनवणे याच्याविरुध्द केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close