क्राइम
किराणा दुकानातून एक लाख रुपयांचा गुटखा जप्त……!
अंबाजोगाई दि. १८ – ( पांडुरंग केंद्रे) कडक लाॅकडाऊन असतानाही किराणा दुकानातून चोरीछुपे गुटखा विक्री करणाऱ्या एका महाभागास पोलीसांनी बेड्या ठोकल्या यावेळी त्याच्याकडून गुटख्यासह १ लाख५५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मंगळवारी दि १८ अंबाजोगाई शहरातील रविवार पेठेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांच्या विशेष पथकाने कारवाई केली. बीड जिल्ह्यात २५ मे पर्यंत कडक लाॅकडाऊन पाळण्यात येत आहे या कालावधीत अगदी किराणा दुकाने भाजीपाला विक्री देखील बंद ठेवण्यात आले आहेत. असे असतानाही रविवार पेठेतील दमगणपुरा भागात जाकेर नासेर मणियार हा त्याच्या किराणा दुकानातून गुटख्याची चोरीछुपे विक्री करत असल्याची गुप्त माहिती सुनिल जायभाये यांच्या पथकाला मिळाली होती. सदर माहितीची खातरजमा झाल्यानंतर मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जायभाये यांच्या पथकाने जाकेरच्या दुकानावर छापा मारला. यावेळी पोलीसांनी दुकानातून राजनिवास बाबाजी विमल एक्का फेमस गोल्डन या कंपन्यांचा एकुण १लाख ५ हजार ४५० रुपयांच्या गुटख्यासह दुचाकी आणि मोबाईल असा दिड लाखांचा मुद्देमाल जप्त करून जाकेर ला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अंमलदार सपकाळ यांच्या फिर्यादीवरून जाकेर नासेर मणियार याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक आर राजा अपर अधिक्षक आर राजा, अपर अधिक्षक स्वाती भोर, डीवायएसपी जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गोपाल सुर्यवंशी सह फौजदार बोडखे पोलीस कर्मचारी सतीश कागणे नितीन आतकरे सपकाळ यांनी पार पाडली.