आरोग्य व शिक्षण

म्युकरमायकोसिस बाबत डॉ.तात्याराव लहाने यांनी दिली महत्वाची माहिती……!

मुंबई दि.२२ – कोरोना संकटाबरोबरच राज्यात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने डोकं वर काढलंय. राज्यात विविध भागात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजारामुळे राज्यात 90 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. अशावेळी कोरोना टास्क फोर्समधील डॉ. तात्याराव लहाने यांनी या आजाराबाबत महत्वाची माहिती दिली आहे. म्युकरमायोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. यापूर्वीही म्युकरमायकोसिस हा आजार होता असं डॉ. लहाने यांनी सांगितलं.

म्युकर जमिनीतून आपल्या शरिरात जातो.पण तो हवेतून पसरतो असं म्हणता येणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना म्युकरमायकोसिसची लागण होते. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नसल्याचं डॉ. लहाने यांनी स्पष्ट केलंय. राज्यात साथीच्या आजारात याचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात म्युकरमायकोसिसच्या सध्या 800 केसेस आहेत. 110 ठिकाणी म्युकरच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात या आजारावरील औषधे सध्या कमी आहे. आधी याची गरज नसल्याने कंपन्यांनी त्याचं उत्पादन केलं नव्हतं. मात्र, आता राज्य सरकारनं म्युकरमायकोसिसवरील औषधांवर नियंत्रण ठेवलं आहे. राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या औषधांचं वितरण होत असल्याची माहितीही डॉ. लहाने यांनी दिलीय.

दरम्यान कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून सध्या उद्योगांचा ऑक्सिजन रुग्णालयांकडे वळवला आहे. मात्र, या इंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे म्युकरमायकोसिस होतो अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्याबाबत माहिती देताना इंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे म्युकरमायकोसिस होतो असं नसल्याचं डॉ. लहान यांनी स्पष्ट केलंय. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी काळजी घेतली पाहिजे. मातीशी संपर्क येऊ देऊ नका. म्युकरची लक्षणं दिसून आल्यास तातडीने डॉक्टरकडे जा, असं आवाहनही डॉ. लहान यांनी केलं आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close