क्राइम

शेतकऱ्यावर पुतण्याचा प्राणघातक हल्ला, तर अन्य एका घटनेत पाऊल वाटेवरून दोघांचे डोके फोडले……! 

 केज दि.१५ – सामाईक पाईपलाईनचे टोपण कुठे आहे अशी विचारणा केल्याच्या कारणावरून एका ५० वर्षीय शेतकऱ्यास पुतण्या व भावाने लोखंडी दाताळ व लोखंडी पाईपने मारहाण करीत प्राणघातक हल्ला केल्याची घटना केज तालुक्यातील दरडवाडी येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
           दरडवाडी येथील शेतकरी गुरुलिंग बारीकराव दराडे ( वय ५०) हे १२ जून रोजी दुपारी ११.३० वाजेच्या बरड नावाच्या शेतात त्यांचा भाऊ गोरख बारीकराव दराडे यांच्या घरी सामाईक पाईपलाईनचे टोपण कुठे आहे अशी विचारणा करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा पुतण्या श्रीहरी गोरख दराडे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी दाताळ उचलून गुरुलिंग दराडे यांच्या कपाळावर मारून गंभीर दुखापत केली. त्याचा भाऊ वडील गोरख दराडे यांनी लोखंडी पाईपने गुरुलिंग यांच्या पाठीत मारहाण करून मुक्कामार दिला. तर सीमा गोरख दराडे व सोनाली श्रीहरी दराडे या महिलांनी शिवीगाळ करीत चापटा – बुक्क्याने मारहाण करून मुक्कामार देत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. गुरुलिंग दराडे यांच्यावर औरंगाबादच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा मुलगा प्रकाश गुरूलिंग दराडे याने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीहरी दराडे, गोरख दराडे, सीमा दराडे, सोनाली दराडे यांच्याविरुद्ध केज पोलिसात कलम ३०७ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करीत आहेत.

तुकुचीवाडीत शेतातील पाऊल वाटेवरून दोघांचे डोके फोडले 

 केज दि.१५ – शेतातून जाणारी पाऊल वाट जेसीबीने का उकरली ? अशी विचारणा केल्याच्या कारणावरून दोघा भावांना कुऱ्हाड आणि लोखंडी गजाने मारहाण करून डोके फोडल्याची घटना तुकुचीवाडी ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
                तुकुचीवाडी येथील सुंदर काशीनाथ चौरे यांनी त्यांच्या शेतातून जाणारी पाऊलवाट जेसीबीने उकरली होती. त्यामुळे शिवाजी मारुती चौरे ( वय ३५ ) यांनी १३ जून रोजी सकाळी नऊ वाजता ही पायवाट का उकरली अशी विचारणा केली असता सुंदर चौरे यांनी तुम्ही कुठुनही वागा हे शेत माझे आहे असे म्हणून शिवीगाळ करीत असताना शिवकन्या सुंदर चौरे हिने अंगावर चटणी फेकली. तर सुंदर चौरे यांनी हातातील कुऱ्हाड शिवाजी चौरे यांच्या डोक्यात मारून डोके फोडत गंभीर जखमी केले. शिवाजी यांचा भाऊ धनराज चौरे हा भांडण सोडविण्यास आला असता माणिक काशिनाथ चौरे, रामदास काशीनाथ चौरे या दोघांनी लाथाबुक्याने मारहाण करीत माणिक चौरे याने हातातील लोखंडी गज धनराज यांच्या डोक्यात मारून डोके फोडले. शिवकन्या चौरे, बारकुबाई सुंदर चौरे, शकुंतला माणिक चौरे या महिलांनी शिवाजी चौरे व धनराज चौरे यांच्या पत्नीस लाथाबुक्कयाने व दगडाने मारहाण करून मुक्कामार दिला.
               अशी फिर्याद शिवाजी चौरे यांनी दिल्यावरून सुंदर चौरे, शिवकन्या चौरे, माणिक चौरे, रामदास चौरे, बारकुबाई चौरे, सुरेखा चौरे, शकुंतला चौरे या सात जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विडा बिटचे जमादार बाळकृष्ण मुंडे हे पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close