मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू, वडिलांची प्रकृती चिंताजनक…….!
शिरूर कासार दि.२० – तालुक्यातील घाटशिळ-पारगाव येथे हृदयाला पिळवटून टाकणारी घटना रविवारी सकाळी समोर आली आहे.मुलाने केलेल्या मारहाणीत जन्मदाती आईचा मृत्यु झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत.फादर्स डेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
दरम्यान या मारहाण प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.बाबासाहेब खेडकर हा काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण करतानाचे दृश्य या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कृत्य तो सतत अधून मधून करत असतो असे येथील काही ग्रामस्थांनी सांगितले. मात्र नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये बाबासाहेब खेडकर याची आई शिवबाई खेडकर यांचा मृत्यू झाला आहे. तर वडील नगर येथील दवाखान्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.