क्राइम

संगनमताने वकीलास लाकडी दांड्याने मारहाण……!

गेवराई दि. २ – तालुक्यातील ब-हाणपुर येथे राहणाऱ्या  एका वकिलाला पक्षकाराचे काम का केले  ? म्हणुन पाडळशिंगी येथील तिघांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन लाकडी दांड्याने मारहान केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील  आरोपी गणेश नारायण दाभाडे, गोविंद भगवान दाभाडे, बालाजी संतोष दाभाडे यांनी संगनमत करून मारहाण केल्याच्या विरोधात गेवराई पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

                पक्षकाराचे काम का केले म्हणुन मारहान करण्यात आली असल्याची तक्रार ऍड. भागवत सुधाकर यादव यांनी गेवराई पोलिसांत दिली असुन सदरच्या घटनेचा गेवराई वकिल संघाकडून जाहिर निषेध करण्यात आला असून  आरोपीने केलेले कृत्य अतिशय निंदनीय असुन सदरील  आरोपीचे वकिलपत्र वकिल संघाकडून कोणीही  स्विकारनार नाही असा ठराव घेण्यात आल्याची माहिती वकिल संघाचे अध्यक्ष ऍड.अमित मुळे यांनी दिली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close