क्राइम

करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी, तर त्यांच्या गाडी चालकावरही गुन्हा दाखल……!

बीड दि.६  प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्हयात सोमवारी अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी करुणा शर्मा परळित आल्या होत्या. रविवारी त्यांच्यावर परळितील एका व्यक्तीवर चाकु हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

              तर परळीत रविवारी करुणा शर्मा यांच्या गाडीत सापडलेल्या पिस्तूलच्या प्रकरणात अखेर पोलिसांनी करुणा शर्मा ज्या वाहनातून आल्या होत्या त्या वाहनाच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भाने पत्रकार परिषद घेण्याची घोषणा करीत रविवारी करुणा शर्मा परळीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या वाहनात पिस्तूल आढळले होते. करूणा शर्मा यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या वाहनांची तपासणी करताना हे पिस्तूल सापडल्याचे पोलीस अधीक्षक आ. राजा यांनी सांगितले.                     या प्रकरणात शर्मा ज्या गाडीतून आल्या त्या गाडीची डिक्की  कोणीतरी उघडून त्यात काहीतरी ठेवत असल्याचा व्हिडीओ काल समोर आला होता, त्याची चौकशी सुरु असून पोलिसांनी सध्या केवळ गाडीच्या चालकावरच शस्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल केल्याचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी सांगितले. करुणा शर्मा यांच्यावर यापूर्वीच प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close