राजकीय

काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आदित्य पाटील….!

9 / 100 SEO Score
बीड दि. ३० – काँग्रेसचे युवा नेते तथा केज नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांना मानाचे स्थान मिळाले आहे.
             भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते आदित्य पाटील मागच्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक काम करत आहेत. खासदार रजनीताई पाटील आणि माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युवक काँग्रेसमध्ये असताना मोठ्या प्रमाणावर पक्षाची संघटनात्मक बांधणी केलेली आहे. आणि याच कार्याची दखल घेऊन काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर वर्णी लावण्यात आली आहे.
            दरम्यान आदित्य पाटील हे केज नगरपंचायत चे नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना शहराच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिलेले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच करातून त्यांचे अभिनंदन होत आहे

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close