#Accident

वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू…..!

6 / 100 SEO Score
केज दि. २७ – शेतातून दिवसभराचे कष्ट उपसून घराकडे परतणाऱ्या एका ५२ वर्षीय शेतमजूर महिलेवर काळाने झडप घातली आहे. शिवारात सायंकाळच्या सुमारास अंगावर अचानक कडकडून वीज पडल्याने एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (ता. २७) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उजनी ता. अंबाजोगाई शिवारात घडली.
            मिळालेल्या माहितीनुसार, घाटनांदूर येथील सालगडी अप्पाराव गव्हाणे यांच्या पत्नी अनिता अप्पाराव गव्हाणे (वय ५२) या उजनी शिवारातील एका शेतात मजुरीचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. दिवसभर काम आटोपून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्या घराकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी ढगांच्या गडगडाटासह अचानक अंगावर वीज कोसळली.
हा धक्का इतका तीव्र होता की, अनिता गव्हाणे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
               मयत अनिता गव्हाणे यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अत्यंत गरिबीत दिवस काढणाऱ्या गव्हाणे कुटुंबावर या घटनेमुळे अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिवसभर मजुरी करून घराकडे परतणाऱ्या गृहिणीचा असा अचानक वीज पडून मृत्यू झाल्याने घाटनांदूर व उजनी परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.स्थानिक प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, पीडित कुटुंबाला शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close