राजकीय

रविवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खा. संजय राऊत केजमध्ये…..!

6 / 100 SEO Score
केज दि. २७ – उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सहा खासदार शिवसेनेत गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेचे काम युद्धपातळीवर घेतलेले दिसत आहे. आणि याचाच एक भाग म्हणुन जे खासदार फुटले त्यांच्या मतदारसंघात दौरा सूरू केला आहे. त्याच अनुषंगाने त्त्यांच्या दौऱ्या दरम्यान काही वेळ ते केजमधेही थांबणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती उबाठा सेनेचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांनी दिली.
                माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परभणीहुन धाराशिव ला रविवार दिनांक २८ जून रोजी जाताना केज शहरात दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक केज येथे आगमन होणार आहे. त्यांच्या समवेत माजी मंत्री आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, शिवसेना सचिव अनिल देसाई,  मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे, सुषमा अंधारे, परशुराम जाधव उपस्थित राहणार आहेत.
           दरम्यान बीड जिल्हा व केज तालुका शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या सह केज तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close