आपला जिल्हा
बीड जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या: सहा पोलीस निरीक्षकांच्या नव्या नियुक्त्या…!

बीड दि. ११ -प्रशासकीय गरज तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस सुधारणा अध्यादेश २०१५ मधील कलम २२ जे-१ नुसार स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तर पोलीस आस्थापना मंडळाने जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षकांच्या (पो.नि.) अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
या बदल्यांमध्ये विनंतीवरून आणि प्रशासकीय आवश्यकतेनुसार महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांतील प्रभारी अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे.
स्वप्नील कचरू उनवणे प्रभारी, पो.स्टे. केज वरून प्रभारी, आगुशा बीड, संतोष शंकर शेजाळ प्रभारी, आगुशा बीड वरून प्रभारी, पोडपअ मु बीड, अशोक काशिनाथ मुदिराज प्रभारी, पोडपअ मु बीड इथून प्रभारी, सायबर पोलीस ठाणे, बीड, राहुल कामाजी सुर्यतळ प्रभारी, पो.स्टे. माजलगाव शहर इथून प्रभारी, पो.स्टे. केज, प्रविणकुमार युवराज बांगर प्रभारी, पोलीस नियंत्रण कक्ष, बीड वरून प्रभारी, पो.स्टे. माजलगाव शहर, निलेश एकनाथराव केळे प्रभारी, सायबर पोलीस ठाणे, बीड इथून प्रभारी, पो.स्टे. पेठ, बीड येथे बदली करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने सर्व बाबींचा विचार करून या बदल्यांना मंजुरी दिली असून, संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित नवीन नियुक्तीच्या ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अधिक सक्षम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.