#Crimeआपला जिल्हाक्राइम

बीडमध्ये मोठी कारवाई: ऊसाच्या शेतात गांजाची लागवड उध्वस्त….!

6 / 100 SEO Score
बीड दि. १० – जिल्हा पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत चक्रांबा पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी धडक कारवाई केली आहे. तालुक्यातील सुरळेगाव शिवारातील ऊसाच्या शेतात बेकायदेशीरपणे केलेली गांजाची लागवड पोलिसांनी उद्ध्वस्त केली असून, एकूण ४८ लाख २७ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, चक्रांबा पोलिसांच्या पथकाने सुरळेगाव शिवारातील गट क्रमांक ११३ मधील ऊसाच्या शेतावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान शेतात लावलेली गांजाची २५३ लहान-मोठी झाडे जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या गांजाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
 गांजाची झाडे: १८४.४ किलो वजनाची २५३ झाडे (किंमत अंदाजे ४६,१०,००० रुपये).
 सुका गांजा: ४ किलो ३०० ग्रॅम (किंमत अंदाजे २,०६,४०० रुपये).
 निमसुका गांजा: ४५० ग्रॅम (किंमत अंदाजे ११,२५० रुपये).
 एकूण मुद्देमाल:४८,२७,६५० रुपये.
या प्रकरणी पोलिसांनी मनोज उर्फ बादल भगवान आंधळे (वय ३६ वर्षे, रा. नगद नारायण वस्ती, सुरळेगाव, ता. गेवराई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
      दरम्यान, ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कन्हाडकर, सहाय्यक फौजदार सोमनाथ कुलकर्णी, पोलीस हवालदार विश्वनाथ प्रधान, नरेंद्र बांगर, पोलीस अंमलदार हनुमान इंगोले, संदीप गायकवाड व प्रशांत घोंगडे यांच्या पथकाचा समावेश होता.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
अमली पदार्थांची लागवड, साठवणूक, विक्री किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा अमली पदार्थ विरोधी पथकाच्या ९२७०२४३२०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close