#Crime

अवैध वाळू, गुटखा आणि देशी दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल…..!

6 / 100 SEO Score
बीड (दि. २२ जुलै २०२६): बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. या धडक कारवाईत पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक, प्रतिबंदित गुटखा आणि बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्यांवर एकाच दिवशी धडक कारवाई करत एकूण ₹३१,९८,७००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
             पोलीस स्टेशन चकलांबा हद्दीत अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम सुरू असताना, पहिल्या कारवाईत उमापूर-माटेगाव रस्त्यावर अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून एक हायवा (MH 23 AU 8500) ताब्यात घेतला, ज्यामध्ये सुमारे ५ ब्रास वाळू आढळून आली. या प्रकरणी हायवा व वाळू असा एकूण ₹३०,३०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाहन चालक शेख रहीम शेख राजू (रा. उमापूर) आणि वाहन मालक शेख अहमद शेख महंमद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत, महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा बेकायदेशीररीत्या वाहतूक करताना एक इसम मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून ₹१,०२,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नाझीम करीम सौदागर (रा. उमापूर) याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय तिसऱ्या कारवाईत, खळेगाव-गेवराई रस्त्यावर संशयित व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याकडे विक्रीसाठी नेण्यात येणारी १८० मिलीच्या १९२ बाटल्या, ९० मिलीच्या ५० बाटल्या अशी देशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल (MH 23 BB 3390) मिळून आली. या कारवाईत ₹६६,७००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करून संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तीनही कारवायांमध्ये एकूण ₹३१,९८,७००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशन चकलांबा येथे सुरू आहे.
       सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक समिर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर, पोलीस अंमलदार हनुमान इंगोले, संदिप गायकवाड व सफौ जमादार यांनी पार पाडली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close