क्राइम

खोटी माहिती देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल…..!

9 / 100 SEO Score

बीड दि ११ – आपत्कालीन मदतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘डायल ११२’ या हेल्पलाइन क्रमांकावर वारंवार खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका ५० वर्षीय इसमावर बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावीर रतनलाल कर्णावट (वय ५०, रा. पांडुरंग रेसिडेन्सी, रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ, बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०७.५० वाजेच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाकडून शिवाजीनगर पोलिसांना माहिती मिळाली की, हद्दीतील एका कॉलरने ‘डायल ११२’ वर संपर्क साधून आपल्या बहिणीचा आणि नातवाचा खून झाल्याची बातमी दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तात्काळ बीड शहरातील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळील पांडुरंग रेसिडेन्सी येथील घटनास्थळी पोहोचले.

तेथे कॉलर महावीर कर्णावट याला बोलावून विचारपूस केली असता, त्याने ‘बहीण फोन उचलत नाही आणि माझ्या घरी मला मारण्यासाठी काही लोक आले होते’ असे सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी महावीर याचे भाऊ रमेश कर्णावट आणि मेहुणे अजित कोटेचा यांच्याकडे खात्री केली. त्यावेळी महावीरची बहीण ही जालना रोडवरील औटी मंगल कार्यालयाजवळ आपल्या घरी सुखरूप असल्याचे आणि असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे निष्पन्न झाले.

तसेच, महावीर याने याच दिवशी सकाळी ०५.१५ वाजेच्या सुमारास देखील ‘डायल ११२’ वर फोन करून ‘माझ्या घरावर कोणीतरी स्प्रे मारून निघून गेले आहे’ अशी खोटी माहिती दिल्याचे तपासात समोर आले. पोलिसांना त्रास व्हावा आणि त्यांची दिशाभूल व्हावी या उद्देशाने जाणीवपूर्वक वारंवार बनावट कॉल केल्याचे स्पष्ट झाल्याने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक लंके यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘डायल ११२’ हा आपत्कालीन परिस्थितीत अवघ्या १० मिनिटांत गरजूंपर्यंत मदत पोहोचवणारा अत्यंत सोपा मार्ग आहे. नागरिकानी केवळ आपत्कालीन परिस्थितीतच यावर संपर्क साधावा; अफवा किंवा खोटी माहिती दिल्यास बीड जिल्हा पोलीस दलाकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवाजीनगर पोलीस ठाणे व जिल्हा पोलीस दलाकडून देण्यात आला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close