राजकीयआपला जिल्हा

लवकरच पुन्हा केज दौऱ्यावर येऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेईन – पालकमंत्री सुनेत्रा पवार

9 / 100 SEO Score

केज दि. १५ –  बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केज येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. बीड येथून परळीकडे जाताना ही भेट अचानक ठरली असली, तरी या आगमनाची माहिती मिळताच तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांनी आडसकर निवासस्थानी मोठी गर्दी केली होती. यावेळी रमेशराव आडसकर व त्यांच्या कुटुंबीयांकडून सुनेत्रा पवार यांचा भावूक सत्कार करण्यात आला.

भेटीदरम्यान रमेशराव आडसकर यांनी केज तालुक्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत सुनेत्रा पवार यांनी, “केज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून शेतकरी व नागरिकांचे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावले जातील,” असे आश्वासन दिले.

या प्रसंगी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, अशोक डक, दत्ता पाटील, ऋषिकेश आडसकर, अंकुशराव इंगळे, हारूणभाई इनामदार, नगराध्यक्षा सिताताई बनसोड, डॉ. अंजलीताई घाडगे, नंदू मोराळे, मुजफ्फर इनामदार, सुनील शिंगारे, अमर पाटील, अझर इनामदार, बाबासाहेब शिंगारे, चंदू भांगे, गोविंद ससाने, शिवराज थळकरी, सुरज घुले, लक्ष्मीकांत लाड, दिलीप गुळभिले, हनुमंत मोरे, युवराज काळे, किरण सातपुते, राधाताई सपकाळ यांच्यासह विविध सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि सुरक्षितता यालाच माझे प्रथम प्राधान्य राहील. वेळेअभावी सर्वांशी सविस्तर चर्चा करता आली नसल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि “लवकरच पुन्हा केज दौऱ्यावर येऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेईन,” असा विश्वास शेवटी दिला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close