#Accident

पेट्रोलच्या शोधात तरुणाचा बळी….!

10 / 100 SEO Score
 केज दि. ४ – तालुक्यातील औरंगपुर येथील तरुण विवेक सुधीर रानमारे (२७) हा दुचाकीवर पेट्रोल आणण्यासाठी आंबा साखर परिसरातील पेट्रोल पंपावर गेला होता. मात्र परत येत असताना रविवारी रोजी सायंकाळी ११ च्या सुमारास टॅंकर – दुचाकीची धडक झाली आणि यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आणि यातच स्वाररा ती रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्याचे निधन झाले.
            मागील चार दिवसांपासून पेट्रोल,डिझेल, सीएनजी चा सर्वत्र तुटवडा आहे. त्यामुळे गाडीत पेट्रोल आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघातात बळी गेला. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून टॅंकर ताब्यात घेतले.
                    तरुणावर औरंगपूर येथील शेतात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरील घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अत्यंत शांत स्वभावी व हुशार व्यक्तीमत्व म्हणुन परिचित असलेला तरुण लातुर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नाशिक येथे मेडीसीन कंपनीत कार्यरत होता. हाडाचे चाळे बसवणे खांदे,   गुडगा, मनकादुखने यावर उपचार करण्यात तो तरबेज होता.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close