#Accident

घरासह कपड्याचे दुकानाला आग….!

6 / 100 SEO Score
अंबाजोगाई दि. २० – तालुक्यातील धावडी येथे शनिवारी सकाळी सुमारे १० च्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत प्रशांत रघुनाथ मस्के यांचे घर व कपड्यांचे दुकान जळून खाक झाले. घटनेची सविस्तर माहिती घेतली जात असून आगीचे कारण समोर येईल.
                      दुर्घटनेत घरातील फर्निचर, टीव्ही, कुलर, वॉशिंग मशीन तसेच दुकानातील साड्या व इतर कपड्यांसह मोठ्या प्रमाणात साहित्य जळून नष्ट झाले.
प्राथमिक माहितीनुसार, विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असून या दुर्घटनेत अंदाजे एक लाख 61 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे घरगुती साहित्य आणि व्यावसायिक माल दोन्हीचे मोठे नुकसान झाल्याने मस्के कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.
            घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटील, सरपंच, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नुकसानीचा पंचनामा करून संबंधित अहवाल प्रशासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close