#Crimeक्राइम

पोलिसांच्या विशेष पथकाची केजमध्ये मोठी कारवाई….!

10 / 100 SEO Score
केज दि. २६ – शहरात विनापरवाना सुरू असलेल्या ऑनलाइन जुगारावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे लोटस् 365. (LOTAS 365) नावाच्या ऑनलाइन जुगार अॅपच्या माध्यमातून लोकांना जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या 8 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
            मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 25 जून 2026 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास केज पोलीस ठाणे हद्दीत LOTAS 365 ऑनलाइन जुगार चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर विशेष पथकाने छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपी अनंत नवनाथ खंदारे (रा. कारेगव्हाण, बीड),अक्षय अनिल गायकवाड (रा. पुणे),अनिल कबीर सानप (रा. बीड) आसाराम बळीराम केकाण (रा. दरडवाडी, केज) गणेश लक्ष्मण खंदारे (रा. कारेगव्हाण), हर्षल मनोहर खंडारे (रा. अमरावती),सुशील दत्तात्रय मुंडे (रा. वडवणी),विशाल उत्तम बारवाळ (रा. छत्रपती संभाजीनगर), यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 397/2026 दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई दरम्यान विविध कंपन्यांचे 34 मोबाईल, 4 दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण 8 लाख 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
           सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शना खाली ग्रे.पो.उप.नि अमीरो‌द्दीन इनामदार, धोंडीराम योगीराज मोरे, राजु वंजारे, विशाल क्षिरसागर, अनिल मंदे, मिसबा इनामदार,मल्लीकार्जुन माने, जरगर, मयुर टकले या विशेष पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close