#Crimeक्राइम

कुंटणखान्यावर पोलिसांचा धडक छापा; पीडित महिलेची सुटका, तीन आरोपींना अटक…..!

9 / 100 SEO Score

बीड दि. ३ – शहरातील जवाहर कॉलनी, चंपावती शाळेच्या मागे भक्ती कन्स्ट्रक्शन रोड परिसरात सुरू असलेल्या एका अनैतिक कुंटणखान्यावर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धडक छापा टाकला. या कारवाईत एका पीडित महिलेची मुक्तता करण्यात आली असून तीन मुख्य आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात बाहेरून महिला बोलावून बेकायदेशीर वेश्याव्यवसाय चालवला जात होता. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर वरिष्ठांच्या लेखी आदेशानुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत प्रकाश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला.

पंच आणि डमी ग्राहकाच्या मदतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी डमी ग्राहकाने दिलेले ३ हजार रुपये रोख, १२ निरोध आणि वेश्याव्यवसायासाठी महिलांची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH-23 AK 5909) असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर ठिकाण हे शासकीय आयटीआय बीडपासून १०० मीटरच्या आत असल्याने, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) १९५६ चे कलम ३, ४, ५, ६, ७ सह भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात विष्णू लक्ष्मण शिंदे (वय ४८, रा. माळीवेस, बीड), शशिकला विष्णू धांडे (वय ६०, रा. कबाड गल्ली, बीड) आणि सचिन विष्णू धांडे (वय ३७, रा. कबाड गल्ली, बीड) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर वेश्याव्यवसायासाठी स्वतःची जागा भाड्याने देणारा शारदुल दिलीपराव देशपांडे (रा. जवाहर कॉलनी, बीड) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत प्रकाश पांढरे, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, पोलीस अंमलदार उषा चौरे, मिरा रेडेकर, प्रदिप येवले, अशोक शिंदे आणि वाहनचालक भाऊसाहेब कारले यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close