#Accident

शेतात काम करताना शॉक लागून ३८ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू…..!

9 / 100 SEO Score

केज दि. १६ – शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून जिवाचीवाडी (ता. केज) येथील एका ३८ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रामकिशन उर्फ अण्णा लक्ष्मण चौरे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ही घटना मंगळवारी (दि. १५) रात्री घडली.

रामकिशन चौरे हे मंगळवारी रात्री आपल्या शेतात काम करत असताना त्यांचा अचानक एका विजेच्या वायरला स्पर्श झाला आणि त्यांना जोरदार शॉक बसला. घटनेनंतर त्यांना तातडीने विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच जमादार उमेश आघाव यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाची उत्तरीय तपासणी (पोस्टमार्टम) केल्यानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत रामकिशन यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. तरुण शेतकऱ्याच्या अशा अचानक जाण्याने जिवाचीवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार उमेश आघाव करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close