क्राइम

दारूच्या नशेत शिक्षिका पत्नीवर चाकूने हल्ला…..!

10 / 100 SEO Score
 केज दि. २४ – कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत पतीने स्वतःच्या शिक्षिका असलेल्या पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना धारूर शहरात घडली आहे. या हल्ल्यात पत्नीच्या उजव्या डोळ्याच्या वर गंभीर दुखापत झाली असून, जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            धारूर येथील तांदळवाडी रोड परिसरातील रहिवासी आणि ज्ञानदीप विद्यालय येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सरिता राजेंद्र बोरकर (वय ३६) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सरिता बोरकर या पती राजेंद्र निवृत्ती बोरकर आणि दोन मुलांसह राहतात. २१ जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पती राजेंद्र हे दारूच्या नशेत धुंद होऊन घरी आले. दारू का प्यायलात असा जाब पत्नीने विचारल्याच्या रागातून पती राजेंद्र यांनी त्यांना अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने घरात असलेल्या चाकूने सरिता यांच्या उजव्या डोळ्याच्या वर वार करून गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने लाथांनी कंबरेवर मारहाण करत पुन्हा विचारल्यास गळा दाबून मारून टाकण्याची धमकी दिली.
          दरम्यान, भांडणाचा आवाज ऐकून परिसरातील शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तात्काळ धाव घेत मध्यस्थी करून पीडितेची सुटका केली. प्रथमोपचारानंतर त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार पूर्ण झाल्यानंतर पीडितेने धारूर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगत फिर्याद दिली. या तक्रारीवरून धारूर पोलिसांनी आरोपी राजेंद्र निवृत्ती बोरकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील कलम ११५(२), ११८(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस शिपाई रेवणनाथ दुधाणे करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close