#Socialआपला जिल्हा
बीड येथे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे व्याख्यान….!

बीड दि. २४ – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हा आयोजित क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षा निमित्त छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे (नाशिक) यांच्या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार दि. 26 जून 2026 रोजी सकाळी 11 : 30 वाजता हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे करण्यात आले असून या व्याख्यानाच्या कार्यक्रमास शाहू – फुले – आंबेडकर प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक महात्मा फुले समता परिषदेची प्रदेश सरचिटणीस तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांनी केले आहे.
11 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2027 हे वर्ष समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा. ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून व माजी खा. समीरभाऊ भुजबळ, आ. पंकजभाऊ भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष घोषित केलेले आहे. या अनुषंगाने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून भिडे वाड्यातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचा चित्ररथ बीडमध्ये आणण्यात आला होता. आता शुक्रवार दिनांक 26 जून 2016 रोजी सकाळी 11 : 30 वाजता हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे “छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे आरक्षणाविषयी तत्कालीन धोरण व आजची परिस्थिती” या विषयावर ज्येष्ठ साहित्यक उत्तमराव कांबळे (नाशिक) यांच्या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस प्रा. सत्संग मुंडे, तुलसी समूहाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, समाजा परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष आबासाहेब खोत, साहित्यिक डॉ. सतीश साळुंके (बीड), परीट समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष गणेश जगताप, बीड नगरपालिकेच्या नगरसेविका सावित्री नितीन साखरे आदी मान्यवरांची उपस्थिती लागणार आहे. तरी या व्याख्यान कार्यक्रमास समता परिषदेचे पदाधिकारी, समता सैनिक, शाहू – फुले – आंबेडकर प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत, समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष निखिल शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश उगले, शहराध्यक्ष नितीन राऊत, राममेजर राऊत, नितीन साखरे, संतोष रासवे, जे. डी. शाह, बापू गाडेकर, दिगंबर नाईकनवरे, सावता काळे, जगन खेत्री, दत्ता बोडखे, कृष्णा शिंदे, मुकुंद शिनगारे, सचिन राऊत, दत्ता गोंदणे, शितलदास अडसुळे, धनंजय काळे, मंगेश जमदाडे, सचिन आडसुळे, अजय राऊत, स्वप्निल शिंदे, राजाभाऊ कटारे, महेश व्यवहारे, अजिंक्य सुरवसे, सुमंत राऊत, शरद विटकर, श्रीमती जयश्री आनंदराव मेश्राम (खेत्री) यांच्यासह समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.